"साहिवाल" गोवंश (राज्यस्थान)

आपल्या भारतीय गोवंशामध्ये सर्वोत्तम दूध देणारा व दुधाची खाण म्हणून परिचीत असलेला गोवंश म्हणजे "साहिवाल" गोवंश होय तीव्र उन्हाळ्यात व विषम हवामानात तग धरुन राहणारा असा गोवंश चांगले गुण पुढच्या पिढीत खात्रीने संक्रमीत करणारा म्हणून देखील या गोवंशाची ओळख आहे.

गोवंशाची उपलब्धता

या गोवंशाचे मुळ उगमस्थान माँटगोमेरी (सध्या पाकीस्तान मध्ये) हे आहे, तेथून हा गोवंश पंजाब राज्यापर्यंत पसरला आहे. भारत पाक सीमेजवळील फिरोजपूर, अमृतसर, हरीयाना, उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड तसेच मध्यप्रदेश या राज्यांमधील काही भागात हा गोवंश चांगल्या प्रकारे सांभाळला जात आहे व विक्रिसाठी उपलब्ध असतो.

शारीरिक ठेवण

या गोवंशाचा रंग प्रामुख्याने किंचीत लालसर ते गडद लालसर यामधील विविध छटांमध्ये आढळतो, काही गायींमध्ये लालसर रंगावर पिवळे किंवा पांढरे गोल ठिपके आढळतात. या गोवंशाची शिंगे अगदी लहान मस्तका लगतच मागच्या बाजूस किवा खालच्या बाजूस झुकलेली दंडगोलाकार टोकाला निमुळती असतात. डोळे काळे किवा पिंगट लाल असतात, पापण्याभोवती पांढरी छटा असते. कान चपटे परंतु लांबट असतात. मान अखूड असते प पोळी (लोळी) मोठी व सैलसर कातडीची असते, पाय एकूण शरीराच्या मानाने लहानसर असतात, कूर काळे किंवा गुलाबी लहान असतात. बेंबीची जागा जाणवण्या इतपत स्पष्ट असते, कास (ओटी) पुर्णत: मागच्या पायात न मावणारी, नजरेत भरणारी चौकोनी लांबटगोल असते. छातीकडून कासेकडे येणा-या दुधाच्या शीरा स्पष्ट मोठ्या व नागमोडी असतात. शेपूट लांबलचक असते प गोंडा शेपटीचा झुपकेदार नसतो. गायींच्या अंगावर कधीही चमक नसते.

या गोवंशाचे बैल मध्यम आकाराचे असतात. बैलांचा रंग गायींप्रमाणेच असतो परंतु वशिंड जवळ काळसर गडद छटेचा असतो. कपाळाच्या मध्यभागी जरा केस जाड असतात. नाकपुडी काळी गोलाकार असते. वशिंड मध्यम आकाराचे घट्ट असते. या गोवंशाचे बैल मंद असतात त्यामुळे फक्त पैदाशीसाठी वापरले जातात. शेतीकाम व वाहतुकीसाठी कमी वापरेल जातात. पूर्ण वाढ झालेल्या व उत्तम तयारीच्या बैलाचे वजन ५०० ते ५२५ कि. गॅ. असू शकते तर पूर्ण वाढ झालेल्या व उत्तम तयारीच्या गायीचे वजन ३२० ते ३४५ कि. ग्रॅ पर्यंत असू शकते. शरिराची मापे पुढील प्रमाणे असतात.

आकारमान शरीराची उंची छातीजवळील लांबी घेर

१. बैल १४० ते १६० ते १८०ते १५० सें.मी. १७० से.मी. १९० सें.मी.

२. गाय १२० ते ११५ ते १५५ ते १३० से.मी. १२५ से.मी. १६६ सें.मी.

या गोवंशाच्या कालवडींचे प्रथम माजाचे वय अंदाजे ३० ते ३६ महिन्यांचे दरम्यान असते. प्रथम वेतामधील दुग्धोत्पादन (सर्वात जास्त) २४ तासामधील ८ ते ९ लिटरच्या दरम्यान सहज असते. दोन वेतांमधील ८ ते ९ लिटरच्या दरम्यान सहज असते. दोन वेतांमधील अंतर १८ ते २१ महिन्यांचे दरम्यान असते, तर यामधील संपुर्णत: भाकडकाळ हा ३ ते ५ महिन्यांचे दरम्यान असु शकतो. या गोवंशाच्या गायी स्वभावाने अतिशय शांत असतात, मालकावर जिवापाड प्रेम करतात, सर्वात महत्वाचे म्हणजे दूध काढण्याचे वेळी पान्हा चोरणे, लाथ मारणे, वासरासाठी दुधाचा पान्हा परत सोडणे अशा प्रकारच्या कोणत्याही खोड्या नसतात.

या उत्तम गुणवत्तेमुळे ऑस्ट्रेलीयन सरकारने सन १९५० पर्यंत हा गोवंश त्यांच्याकडे अनेक वेळा सन १९५० पर्यंत हा गोवंश त्यांच्याकडे अनेक वेळा नेला आणि संशोधनात्मक अभ्यास करुन संकरीत दोन आदर्श गोवंश निर्माण केले. आपल्या देशात प्रथमपासून मिलेटरी डेअरी फार्म, सरकारी डेअरी फार्म, शासकीय कृषी महाविद्यालय ह्यांचेकडे मुळचा गोवंश म्हणून उपयोगात आणला आहे. ह्या गोवंशाच्या उत्तम गाजीची किंमत साधारणपणे ३५ ते ४० हजारांचे दरम्यान असते व एका जागी चांगल्या मेहनतीवर एका मालकाकडे १० ते १२ वेणी सहज होतात.