शंका व प्रश्नउत्तरे

भारतीय 'हिंदू' संस्कृतीतल्या पारंपरिक श्रद्धेप्रमाणे मंगलमय प्रसंगी (जसे वाढदिवस, लग्न, मुंज, बारसे, वगैरे) किवा व्यक्तीच्या मृत्यूपश्चात जे 'दान' सुचवलेले आहे त्यातील 'गोदान' हे सर्वश्रेष्ठ दान आहे. संपत्तीशुद्धी आरोग्यवृद्धी, आदी विविध फलप्राप्तीसाठी 'गोदान' हे दानांतील सर्वोत्तम दान म्हणून मानले गेले आहे. व्यक्तिगत श्रद्धा आणि विश्वास यानुसार तसेच सदसद्विवेक बुद्धीनुसार गोदान केले जाते.
'गोदान संस्कार' हा व्यक्तिगत श्रद्धेचा भाग आहे. विद्ववान पौरोहित्य करणारे गुरुजी, वैदिक व शास्त्रोक्त विधी, होम व हवनासह 'गोदान संस्कार' हा खर्चिक भाग आहे. यासाठीच संस्था देणगीदाराच्या व दात्यांच्या व्यक्तिगत इच्छेनुसार स्वातंत्र्य गोदानासाठी देते.
गोदानासाठीची गाय उत्तम वंशाची, दुधाळ, धुष्टपुष्ट, निरोगी आणि उत्तम प्रजननक्षम असावी. संस्थेकडील तज्ज्ञ पशुवैद्यक या सर्व गोष्टींची खात्री करतात. संस्थेकडील तज्ज्ञ परीक्षक स्वत: खात्री करून गायीची निवड करतात. संस्थेकडे कायमस्वरुपी उत्तम वंशासाठी,पैदाशीसाठी गाय उपयुक्त ठरावी म्हणून त्या दृष्टीने निवड केली जाते.
होय. दात्याला वेळोवेळी संस्थेचा अहवाल पाठवला जातो. मंगलप्रसंगी, तसेच महत्त्वाच्या सणांदिवशी (गोकुळाष्टमी, गोवत्स दवादशी, गोपाष्टमी) दात्यांना निमंत्रित केली जाते. सातत्यपूर्ण संवादातून दात्यासह संबंध प्रस्थापित व अखंड राखले जातात.
गोदान संस्कारासाठी खर्चाचे कोणतेही बंधन नाही. देणगीदाराचे व्यक्त केलेल्या इच्छेनुसार 'गोदान-संस्कार' घडवला जातो. दात्याने म्हणजेच देणगीदाराने 'गाय' खरेदी करुन दोरी (दावे) लावून संस्थेकडे थेट दान दिली तरी आंनदाने सर्व उपस्थितांना साखर वा गोड पेढे, फळवाटप करुन "गोदान-संस्कार" संपन्न करुन, पावन करुन घेतले जाते.
वरील कोणत्याही योजनेत अगदी १ रुपया देऊनही सहभागी होता येईल. दात्याची दानाची इच्छा सर्वश्रेष्ठ मानून त्याच्या इच्छेनुसार त्याने देऊ केलेली रक्कम स्विकारली जाते. मात्र 'गोग्रास-दान' शक्यतो १००/- (शंभर रुपये) असावे अशी अपेक्षा असते.
महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात संस्था गोवंशसंवर्धन अभियान उपक्रम आयोजित करु शकते. भौगोलिक अंतर, स्थानिक संबंधित संस्था, उपक्रम आयोजित करु शकते. भौगोलिक अंतर, स्थानिक संबंधित संस्था, त्या संस्थेचे मनुष्यबळ व व्यवस्थापन आदी इतर सर्व तांत्रिकत तपशिल पाहून, ठरवून, परस्पर सहकार्य करार (mou) करुन 'नवजीवन विकास सेवा' संदर अभियान आयोजित करुन समन्वयन करते.
'गोदान' घेतले जाताना 'गीर' जातीचीच गाय हवी अशी जाचक अट नाही. अन्य जातीची म्हणजेच भारतीय शुद्ध वंशाची ( जसे खिलार, साहिवाल, गवळाऊ, लाल कंधारी, देवणी इत्यादी) गाय संस्था स्विकारते. संस्थेच्या प्रशिक्षित सल्लागारामार्फत तसेच संस्थाध्यक्ष संस्थेचे तज्ज्ञ पशुवैद्यक उत्तम गाय निवडतात. संस्था स्वत:च्या गोशाळेतील गायींच्या जातींची संख्या पाहून आवश्यक जात दान रक्कमेनुसार ठरवते.